.
एक अभिनव सेवा "मध्यस्थ". अधिक माहितीसाठी तथास्तु कार्यालयाशी संपर्क करा
  09209655728

 

.
LOGIN
Customer Login
Email:
Password:
 
  Forgot Password
  Register Profile

.
SEARCH SOULMATE
Gender:
Marital Status:
Age: to
 
  .
Welcome to Tathastu Vivah Sanstha

 तथास्तु विवाह संस्था

“मध्यस्थाची आपुलकी आणि व्यावसायिक तत्परता” हे ब्रीद अंगीकारून सन २००६ मध्ये तथास्तु विवाह
 संस्था स्थापन झाली. जगभर पसरलेल्या महाराष्ट्रीय ब्राह्मण वधू-वरांचे विवाह जमविण्यात तथास्तु
 मोलाचे योगदान देत आहे.

 वैशिष्ट्ये :
  • अतिशय सोपी व सुटसुटीत कार्यपद्धती
  • संस्थेतील अनौपचारिक व मोकळे  वातावरण
  • विस्तृत डेटाबेस - पालकांना मार्गदर्शन
  • विवाहपूर्व समुपदेशन
  • संस्थेमध्ये येऊन फाईल्स व संगणकावर स्थळे बघण्याची सोय
  • इ-मेलद्वारे घरपोच स्थळे.
 अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे अल्पावधीतच तथास्तुने असंख्य पालकांचा विश्वास संपादन केला व तथास्तु
 विवाह संस्था हे नाव घराघरात पोहोचले.

 संचालिका

 डॉ.सौ. निमा भुजाड एम.बी.ए.,- एच.आर., विवाह समुपदेशक, निसर्गोपचार तज्ञ. सौ. निमा भुजाड यांनी   औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रशासनप्रमुख म्हणून वीस वर्षे कार्य केले. कामगारांचे व्यावसायिक व कौटुंबिकही
 प्रश्ने सोडविण्यात नेहमीच यशस्वी. त्यामुळे प्रशासनाचा भाग असूनही कामगाराचा विश्वास व आपुलकी 
 मिळविली. नोकरीत असतानाच सामाजिक बांधिलकी म्हणून गेली दहा वर्षे विवाह समुपदेशनाचे कार्य
 केले व अनेक संसार सावरण्यास मदत झाली . समुपदेशन करतानाच विवाह जमविण्यातील त्रुटी लक्षात
 आल्या, ह्या त्रुटी दूर करून विवाह जुळविताना मार्गदर्शन केले तर अनेक संभाव्य अडचणी येऊ नये ह्या
 उद्देशाने ‘तथास्तु’ विवाह संस्थेची स्थापना झाली. सौ. निमा भुजाड यांचा या क्षेत्रातील दीर्घ अनुभव,
 आत्मविश्वास आणि मुलामुलींबद्दलची आपुलकी ह्यामुळे तथास्तुने आपले वेगळे अस्तित्व सिद्ध केले आहे.

© G-SAK Technologies